तरी ऐका बरं !

मनात येणारे विचार तसे; सारेच भानगडीचे
मनात येणारं सारच काही; नसते खरं
म्हणुण; कामानिमीत्त संबंधीत व्हावं
अन्यथा; आपन बरं अणि आपलं घर बरं

किती लू लू करतात लोकं; ह्याच्यासाठी अाणि त्याच्यासाठी
किती धू धू जळतात लोकं; ह्याच्यासाठी अाणि त्याच्यासाठी
आयुष्यभर मनाने वागतात; परंतु काय त्यांच्या पदरी पडते बरं
.. ||१||
मनात येणारं सारच काही नसते खरं ..

मी आज एक स्वप्न पाहिलं, चिंतीत झालो; उताविळ झालो
आणि जसा असतो स्वप्ना बाहेर; तसाच मी त्या स्वप्नातही झालो
पण झोप उघडली आणि सर्व काही बरं झालं  .. ||२||
मनात येणारं सारच काही नसते खरं ..

मनात येणारे विचारही स्वप्नांसारखेच
फरक एवढाच की, झोपेत येतात म्हणुण स्वप्न
आणि दिवसाढवळ्या येतात म्हणुण विचार
आता सांगा; तुम्ही ह्याला काय म्हणाल बरं
.. ||३||
मनात येणारं सारच काही नसते खरं ..

म्हणुण; शेतकरी बांधुंनो, दमानं घ्या, आत्महत्या करू नका
खुप केल्या जनांनी चुका; तुम्ही तरी करू नका
कुणाला नसेल परंतु; मला तुमची गरज आहे;
तरी ऐका बरं !
.. ||४||
मनात येणारं सारच काही नसते खरं ..

रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर