वेड्याहून वेडी माया

वेड्याहून वेडी माया
तुझीयावर केली राया

अंगवळणी पडल्या सुरती
विराणी गेली दूर ती
आकाशी जडले घडले
आताशी मी ही धरती
रमनाच्या अवती भवती
मिलनाची वेली व्हाया

ओथंबुन अश्रु नाहल
ओठही ते चिंब जाहल
गालांच्या खळयांमधूनी
प्रीतीचे स्मित वाहिले
कव केले होते सव ते
विळली होती मज काया

पाहिले डोळा भरुनी
जीवाला गोळा करुनी
स्तवन स्त्रवले रे वदनी
प्रवण मी आहे अजुनी
पुनवे सम शितललेली
अवसेची श्यामल छाया

रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर