खेळ सारा क्लुप्त्यांचा

शेतकरी मी कामकरी, घाम करी मी रक्ताचा
जुळवून घेतो मातीशी, मोलकरी मी वक्ताचा
जीवाचे मी रान गाळतो, प्रेमाने अभिमानाने नावकरी ना रावकरी, गावकरी मी हक्काचा

माझ्या कुशीत जन्म पावते, हिरव्या नभाचे चांदने
उभ्या जगाचा मानकरी मी, दानकरी मी तख्ताचा

परी पांढरपेश्या कावळ्यांनी, माझी केली दूर्गती
मी वेचलेल्या ओंजळींवर, हक्क त्यांच्या हप्त्यांचा

डोळे पुसून ठेवले मी, हैरान माझे साकडे
खेळ सारा क्लुप्त्यांचा, मज मार लाथा बुक्क्यांचा