आई तुझ्या कुशीत; पडलो प्रथम जेव्हा
हसने शिकवले तु; रडलो प्रथम जेव्हा
चालायला शिकवले; बोलायला शिकवले
जगने शिकवले तु; अडखडलो प्रथम जेव्हा..!
तुझ्या दमाने माझ्या रक्तात आली लाली
धगधगणे शिकवले तु; घाबरलो प्रथम जेव्हा
तुझ्यापुढे ग आई देवा-दिदेव खुजे
बहरणे शिकवले तु; हरलो प्रथम जेव्हा
हसने शिकवले तु; रडलो प्रथम जेव्हा
चालायला शिकवले; बोलायला शिकवले
जगने शिकवले तु; अडखडलो प्रथम जेव्हा..!
तुझ्या दमाने माझ्या रक्तात आली लाली
धगधगणे शिकवले तु; घाबरलो प्रथम जेव्हा
तुझ्यापुढे ग आई देवा-दिदेव खुजे
बहरणे शिकवले तु; हरलो प्रथम जेव्हा