माझ्याही पेक्षा; खरच् खुप शहाणं आहे हो; पाळण्यातलं मुल !

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेतो सुक्ष्मातीसुक्ष्म; तरी मी मात्र स्थुल
माझ्याही पेक्षा; खरच् खुप शहाणं आहे हो;
पाळण्यातलं मुल

मी शरीराने वाढलो; पण जागृतीने नाही
झोपेत असो वा दिवसाढवळ्या; मी स्वप्नांतच राही
भाविकाचा मी वैचारीक झालो म्हणुण; मी झालो शहाणा
अन्यथा; माझ्या ठायी निर्विचारतेचे दागीणे नाही
असा मी विचारवंत; घरी नाही चुल
माझ्याहीपेक्षा; खरच् खुप शहाणं आहे हो;
पाळण्यातलं मुल

हे माझ्या मना ! मला नेहमी आठवण करून देत जा
काही आले विचार तरी; त्यांना विकार म्हणुणच घेत जा
नको करू रे साठवण; ह्या असल्या खंदकांची
काही आले निकाल तरी; त्याला शिकाल म्हणुणच घेत जा
आनखीन किती काळ राहायच ह्याच ह्या तिरी; नदी विनापुल
माझ्याही पेक्षा; खरच् खुप शहाणं आहे हो;
पाळण्यातलं मुल