सोड फुकात

सोड फुकात; झालं हिरुन,
कर सुटका तु आपली; कटकटीतून.

भुई थोडी; लोकं भारी; संख्येने,
शेळ्या मेंढरांवाणी; अकलेने.
देवधर्माचे व्यसन; जडलेले,
मर्तेमढे पदोपदी; अडलेले.
हया दुःखात; झालं खिळुन,
कर सुटका तु आपली; कटकटीतून.

शिक्षणाची गोडी नाही; कसलीही,
बाया माणसांची जात; नकलीही.
भुकेपरि बात यांची; बैमानं,
जानतेही झाले सारे; हैरानं.
चल सुखात; झालं मिळुन,
कर सुटका तु आपली; कटकटीतून.

रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर