गजल: माणसांच्या भीतीने

एसीत मेला हो, उन्हाळा; माणसांच्या भीतीने
वेशीत मेला हो, हिवाळा; माणसांच्या भीतीने

सृष्टिच सारी आटली; शेतीच काय वेगळी
शेतीत मेला हो, जिव्हाळा; माणसांच्या भीतीने

जुलमी असा मी पोरका; नाव ठेऊ का कुणा
नदित मेला हो, लव्हाळा; माणसांच्या भीतीने

पीक घेतसे मी हे अशे; नगदी मिळाले पाहीजे
टेसीत मेला; माझा मळा, माणसांच्या भीतीने

सरकार करणे नाही हो; सरकारला पै पाहिजे
त्यांचाही गोंधळ सावळा; माणसांच्या भीतीने

कोणी न केली शेती हो; सांगा मला ह्या भुवरी
प्रेषित मेला हो, सांभाळा; माणसांच्या भीतीने