आले अतिथी गेले अतिथी

आले अतिथी गेले अतिथी
अशी रित आहे इथे जीवनाची

मी ऐकिले ते तुला सांगतो मी
नि:शब्दात आहे ध्वनी जीवनाची

मी स्पर्शीले ते तुला सांगतो मी
प्राणवान आहे मिठी जीवनाची

मी पाहिले ते तुला सांगतो मी
अरे तोड नाही जगी जीवनाची

मी चाखीले ते तुला सांगतो मी
अरे गोड आहे चवी जीवनाची

मी गंधीले ते तुला सांगतो मी
कस्तुरी सामान आहे इति जीवनाची

मी जाणीले रे माझ्या परीने
तुला जान आहे तुझ्या जीवनाची