कविता ही पाहिलेली कविता
पाहिलेल्यास शब्द वाहिलेली कविता
कविता जीवांची ओढ कविता
स्वप्ने उद्याची गोड कविता
कविते मला ह्या अर्थ यावा
अर्थे जनांना तदर्थ यावा
यावा असावा अंगीकृत भारत
अंगीकृत भारताची एक कविता
पाहिलेल्यास शब्द वाहिलेली कविता
समतेचा संवेद कविता
बंधुतेचा वेध कविता
कविते मला ह्या स्वअर्थ यावा
अर्थे जनांना तदर्थ यावा
यावा असावा अधीनियमित भारत
अधीनियमित भारताची एक कविता
पाहिलेल्यास शब्द वाहिलेली कविता
स्वातंत्र्याचा घोष कविता
न्यायाचा उद्घोष कविता
कविते मला ह्या परमार्थ यावा
अर्थे जनांना तदर्थ यावा
यावा असावा स्वअर्पीत भारत
स्वअर्पीत भारताची एक कविता
पाहिलेल्यास शब्द वाहिलेली कविता
रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर
पाहिलेल्यास शब्द वाहिलेली कविता
कविता जीवांची ओढ कविता
स्वप्ने उद्याची गोड कविता
कविते मला ह्या अर्थ यावा
अर्थे जनांना तदर्थ यावा
यावा असावा अंगीकृत भारत
अंगीकृत भारताची एक कविता
पाहिलेल्यास शब्द वाहिलेली कविता
समतेचा संवेद कविता
बंधुतेचा वेध कविता
कविते मला ह्या स्वअर्थ यावा
अर्थे जनांना तदर्थ यावा
यावा असावा अधीनियमित भारत
अधीनियमित भारताची एक कविता
पाहिलेल्यास शब्द वाहिलेली कविता
स्वातंत्र्याचा घोष कविता
न्यायाचा उद्घोष कविता
कविते मला ह्या परमार्थ यावा
अर्थे जनांना तदर्थ यावा
यावा असावा स्वअर्पीत भारत
स्वअर्पीत भारताची एक कविता
पाहिलेल्यास शब्द वाहिलेली कविता
रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर