जातीला नजरबंद करून पहा कधीतरी

जातीला नजरबंद करून
पहा कधीतरी
तुम्ही म्हणाल
जाते ही जात
अजवरी झाला हो घात

अंधारातून बाहेर यावे
स्वकर्माला जागे रहावे
टाकुनी कात
तुम्ही म्हणाल
जाते ही जात
अजवरी झाला हो घात

जातीला नजरबंद करून
पहा कधीतरी

रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर