भूतांचा कर्दन काळ

भूतांचा कर्दन काळ; तारुण्य वृद्ध आबाळ,
सूर्याहुन शुभ्र सकाळ; निरभ्र निळ आभाळ.
याहूनही जे जे म्हणुनी ते ते सारे कळले,
जीव घेणा माझ्या प्रेमा; ज्ञाते सारे ढळले.

समयाची इवली डीवली; दिक्काली साउली शिवली,
तव गेले विषयां विषयी; विषयांची राखहि निवली.
याहूनही जे जे म्हणुनी ते ते सारे कळले,
जीव घेणा माझ्या प्रेमा; ज्ञाते सारे ढळले.

हृदयाच्या अवती भवती; दिशयांनी केली किवली,
मनमानी उरी उदरी; अन पानी राखहि निवली.
याहूनही जे जे म्हणुनी ते ते सारे कळले,
जीव घेणा माझ्या प्रेमा; ज्ञाते सारे ढळले.

रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर