देव नाही ना भेव नाही

देव नाही ना भेव नाही
तरी माणसाला चेव नाही
हावेतुन निघुन हूपेत धसतो
कोणाती काही ठेव नाही
पंचपक्वान्न वाढून सारे,
पण उपासमेला; जेव नाही
ज्याची त्यालाच नाही; तर कोणास गोडी
उधारबोड्यास केव नाही

रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर