ए सी त मेला हो उन्हाळा, माणसांच्या भीतीने
वेशीत मेला हो हिवाळा, माणसांच्या भीतीने
सृष्टिच सारी आटली, शेतीच काय वेगळी
शेतीत मेला हो जिव्हाळा, माणसांच्या भीतीने
जुलमी असा मी पोरका; नाव ठेऊ का कुणा
नदित मेला हो लव्हाळा, माणसांच्या भीतीने
पीक घेतसे मी हे अशे, नगदी मिळाले पाहीजे
टेसीत मेला माझा मळा, माणसांच्या भीतीने
सरकार करणे नाही हो, सरकारला पै पाहिजे
त्यांचाही गोंधळ सावळा, माणसांच्या भीतीने
कोणी न केली शेती हो, सांगा मला ह्या भुवरी
प्रेषित मेला हो, सांभाळा, माणसांच्या भीतीने
रचनाकार/कवि~ डॉ. रविपाल भारशंकर